‘देशातील गुन्हेगारी आणि दहशतवादांसारख्या समस्यांशी लढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा वेदाकडे वळायला हवं,’ असं केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी म्हटंले आहे.
दिल्लीत शुक्रवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात वेदांचं महत्त्व सांगताना सत्यपाल यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘देशाचे गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल तर आपल्याला पुन्हा वेदांची मदत घ्यायला हवी.
आपल्या देशात अनेक समस्या आहेत. या समस्यांचं कायमस्वरूपी उच्चाटन करायचं असल्यास आपल्याकडे ऋषीमुनींचे वेद हाच एक पर्याय आहे, ऋषीमुनींचं ज्ञान या सर्व समस्यांमधून आपल्याला बाहेर काढण्यास नक्की मदत करेल,’ असं ते म्हणाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथ घेताना बायबल हातात घेतात, त्याचप्रमाणे भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हातात वेद घेऊन शपथ घेतील अशा भारताचं स्वप्न मी पाहतो आहे,’ असंही सत्यपाल यांनी म्हटंले आहे.