Bijli Tigress Death: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांची लाडकी वाघीण ‘बिजली’ काळाच्या पडद्याआड; 18 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईतील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) लाखो पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'बिजली' (T2) नावाच्या वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Bijli Tigress Death: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांची लाडकी वाघीण ‘बिजली’ काळाच्या पडद्याआड; 18 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bijli Tigress Death: मुंबईतील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) लाखो पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'बिजली' (T2) नावाच्या वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाढत्या वयामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती सातत्याने खालावत होती. बुधवारी रात्री 9:45 वाजण्याच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी तिचे वय 18 वर्षे 4 महिने इतके होते. तिच्या निधनामुळे राष्ट्रीय उद्यान प्रशासनासह वन्यजीव प्रेमींमध्ये कमालीची हळहळ व्यक्त केली जात आहे.

महिनाभरापासून कमी झाला होता आहार; तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार.. मात्र..
उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरापासून बिजलीचा आहार हळूहळू कमी होत गेला होता, ज्यानंतर तिच्यावर सतत वैद्यकीय देखरेख ठेवली जात होती. पशुवैद्यकीय अधिकारी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तांत्रिक पशुवैद्यकीय सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली तिला वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक सेवा देण्यात आल्या. मात्र, डॉक्टरांच्या पथकाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. प्राथमिक अंदाजानुसार वृद्धापकाळामुळेच हा मृत्यू झाला असला, तरी अधिकृत आणि नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी नियमानुसार तिचे शवविच्छेदन (Post-Mortem) केले जाणार आहे.

हेही वाचा – Crime News: वडिलांना वाचवायला धावली अन् जिवाला मुकली; जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी बाप-लेकीला संपवलं

पेंच व्याघ्र प्रकल्पातून मुंबईत आगमन; 10 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य
बिजलीला 11 जुलै 2016 रोजी नागपूरजवळील पेंच व्याघ्र प्रकल्पातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. तेव्हापासून म्हणजे 10 वर्षांहून अधिक काळ ती या उद्यानाच्या आणि काळजीवाहू पथकाच्या विशेष देखरेखीखाली होती. तिच्या शांत आणि आकर्षक वावरामुळे पर्यटकांसाठी ती नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिली. उद्यानातील देखभाल आणि पशुवैद्यकीय पथकासाठीही बिजली अत्यंत जिव्हाळ्याची बनली होती.

संवर्धन आणि जनजागृतीतील मोलाचे योगदान; प्रशासनाकडून आदरांजली
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आपल्या दीर्घ वास्तव्यादरम्यान बिजलीने वन्यजीव संवर्धन, व्यवस्थापन आणि प्राण्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. तिच्यामुळे लाखो पर्यटकांना वन्यजीवांचे जवळून दर्शन घेण्याची संधी मिळाली. उद्यान प्रशासनाने बिजलीच्या मृत्यूवर खोल दुःख व्यक्त करत तिच्या वन्यजीव संवर्धनातील या अतुलनीय योगदानाला भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भगवान शंकराच्या संकल्पनेवर आधारित क्रिकेट स्टेडियम, काय आहेत वैशिष्ट्ये?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number