जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला उसळलेल्या दंगलीप्रकरणी संभाजी भिडे व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक सांगलीत दाखल झाले आहे.
मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे या दोघांवरही दंगली नंतर गंभीर आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती. या दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे चौकशीनंतर मिलिंद एकबोटे यांना अटकदेखील करण्यात आली. आता संभाजी भिडेंवरही कारवाईची शक्यता निर्माण झालीय.