‘साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही’

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी भक्तांचे श्रद्धासबुरी साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही, असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. तसेच, कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करू सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असेही धीरेंद्र […]

‘साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही’

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी भक्तांचे श्रद्धासबुरी साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही, असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. तसेच, कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करू सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

शिर्डीच्या साईबाबा यांच्याबाबत धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली जात आहे. तर शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईभक्तांनी शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी माफी मागावी अशी मागणी साईभक्तांकडून करण्यात आली आहे. तर, साईबाबा हे आमचे दैवत आहेत, अशी प्रतिक्रिया साईभक्तांनी दिली आहे.

धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले?

जबलपूरमधील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री म्हणाले, शंकराचार्य यीं साईबाबा यांना देवाचे स्थान दिले नाही. आणि शंकराचार्य यांचे म्हणणे समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह होऊ शकत नाही, देव देव आहेत, संत संत आहेत. त्यामळे साई हे देव नाहीत हे शंकराचार्य यांचे विधान प्रमाण असल्याचे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number