रशिया-युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. रशियाची युक्रेनवर लढाई सुरूच असून गेल्या काही दिवासांपासून तणावग्रस्त लढाई सुरू आहे. दरम्यान, रशियाकडून युक्रेनमध्ये काही काळासाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.३० वाजल्यापासून युद्धविरामाची घोषणा करण्यात आल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमधील युद्ध थांबवत असल्याची घोषणा रशियाने केली आहे. लोकांची मदत करण्यासाठी तसेच मानवी कॉरिडोर खुले करण्यासाठी रशियाकडून युद्ध थांबवण्यात आले आहे. युक्रेनच्या बहुतांश भागात बिकट परिस्थिती ओढणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना रशियाकडून तात्पुरता शस्त्रसंधीची घोषणा केली आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या युद्धात रशियाचे १० हजार सैनिक मारले असल्याचे युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांनी सांगितले आहे. तसेच दुसरीकडे, रशियन सैन्याने युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या निवास स्थानाजवळ क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यामुळे रशियाकडून राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या हत्येचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.