Crime News: वडिलांना वाचवायला धावली अन् जिवाला मुकली; जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी बाप-लेकीला संपवलं

अवराडी ग्रामपंचायत कार्यालयात कागदपत्रांची अधिकृत पडताळणी सुरू असतानाच रुद्रप्पा यांचे सख्खे भाऊ बसप्पा व संगप्पा आणि पुतण्या मदिवलप्पा यांनी तिथे घुसून अचानक हल्ला चढवला.

Crime News: वडिलांना वाचवायला धावली अन् जिवाला मुकली; जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी बाप-लेकीला संपवलं

Crime News: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील बेळगाव जिल्ह्यात जमिनीच्या जुन्या वैमनस्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी भीषण घटना घडली आहे. मूळचे अवराडी येथील रहिवासी असलेले 67 वर्षीय माजी सैनिक रुद्रप्पा कुंदरगी आणि त्यांची 26 वर्षांची मुलगी शशिकला यांना भरदिवसा शासकीय कार्यालयातच तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून संपवण्यात आलं. अवराडी ग्रामपंचायत कार्यालयात कागदपत्रांची अधिकृत पडताळणी सुरू असतानाच रुद्रप्पा यांचे सख्खे भाऊ बसप्पा व संगप्पा आणि पुतण्या मदिवलप्पा यांनी तिथे घुसून अचानक हल्ला चढवला. या घटनेमुळे संपूर्ण सीमाभागात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

वडिलांना वाचवायला गेलेल्या मुलीवर दगडाने वार 

धारवाड येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक रुद्रप्पा हे आपल्या 38 गुंठे जमिनीच्या कायदेशीर हक्कासाठी आणि शासकीय नोंदींसाठी मुलगी शशिकला हिच्यासह गावात आले होते. भावांसोबत न्यायालयात सुरू असलेल्या वादात निकाल लागूनही भाऊ त्यांना हिस्सा देण्यास नकार देत होते. कार्यालयात वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी रुद्रप्पा यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणे वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना वाचवण्यासाठी पुढे धावलेल्या शशिकला हिच्यावरही नराधमांनी दया दाखवली नाही. तिच्या डोक्यात दगडाने सपासप वार करून आणि केस कापून अत्यंत क्रूरपणे तिचा बळी घेण्यात आला.

हेही वाचा – Latur Crime : लातूर हादरलं! शाब्दिक बाचाबाचीतून तरुणावर भररस्त्यात चाकूहल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

कारचालकासह मित्र गंभीर जखमी 

या प्राणघातक हल्ल्यात रुद्रप्पा यांचा कारचालक आणि मुलीचा मित्र राहुल हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर धारवाड येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी दुपारी 12 च्या सुमारास उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केला होता, जो पोलिसांनी मुख्य पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, पसार झालेल्या आरोपी भावांचा आणि पुतण्याचा शोध सुरू आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number