Rupali Chakankar Resign : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चाकणकरांनी दिला राजीनामा

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहि

Rupali Chakankar Resign : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चाकणकरांनी दिला राजीनामा

नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात आणि रूपाली चाकणकरांचे अनेक फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.

हेही वाचा- Rupali Chakankar : खरात प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकरांपर्यंत; राजीनाम्याचे आदेश मिळताच चाकणकरांनी ट्वीटमध्ये मांडला तो मुद्दा

राजीनाम्यापूर्वी रूपाली चाकणकर यांनी मुंबईमध्ये पोलीस महासंचालकांची देखील भेट घेतली. दरम्यान रूपाली चाकणकर यांनी या सगळ्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता आता मोठी बातमी समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून सध्या केवळ महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number