RSS on CJP Protest : आरएसएस नेते अतुल लिमये यांच्याकडून CJP आंदोलनाची पोलखोल; सपोर्ट सिस्टीम अन् मेथडॉलॉजी उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सर-सहकार्यवाह अतुल लिमये यांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मोठे वक्तव्य केले. भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर युवा शक्तीचे योगदान महत्त्वाचे असून त्या युवकांवर योग्य संस्कार, विचार आणि राष्ट्रीय भावना असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना […]

RSS on CJP Protest : आरएसएस नेते अतुल लिमये यांच्याकडून CJP आंदोलनाची पोलखोल; सपोर्ट सिस्टीम अन् मेथडॉलॉजी उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सर-सहकार्यवाह अतुल लिमये यांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मोठे वक्तव्य केले. भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर युवा शक्तीचे योगदान महत्त्वाचे असून त्या युवकांवर योग्य संस्कार, विचार आणि राष्ट्रीय भावना असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना लिमये म्हणाले की, या आंदोलनाकडे केवळ राजकीय किंवा भाजपविरोधी आंदोलन म्हणून पाहू नका. हे आंदोलन संविधानाच्या विरोधात आणि राष्ट्राच्या विरोधात उभे करण्यात आले होते. या आंदोलनामागील विचार आणि उद्देश काय होते, याचा गंभीरपणे अभ्यास होणे आवश्यक आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Bharat Gogawale On Raigad Guardian Minister : “फक्त डिक्लरेशन बाकी आहे, ते पण…” रायगड पालकमंत्रीपदाबाबत मंत्री भरत गोगावलेंच मोठ वक्तव्य

यावेळी बोलताना लिमये म्हणाले की, या आंदोलनाकडे घटना आणि खुद्द राष्ट्राविरुद्धच शस्त्र म्हणून वापरली जाणारी चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. “याकडे केवळ ‘भाजप-विरोधी’ दृष्टिकोनातून पाहू नका. त्याऐवजी, संविधानाच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरली जाणारी किंवा संविधानाला विरोध करण्याचे साधन बनलेली एक चळवळ म्हणून याकडे पहा. राष्ट्राविरुद्ध म्हणजेच भारताच्या विरोधात उभारली गेलेली चळवळ म्हणून याकडे पहा आणि याच दृष्टिकोनातून आपण या शक्तीचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले. 

विद्यार्थी आंदोलनांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, असे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्याऐवजी, घटनात्मक मूल्ये, राष्ट्रीय हित आणि तरुण पिढीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैचारिक शक्तींच्या व्यापक संदर्भात या आंदोलनांकडे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थी राजकारण, कॅम्पसमधील आंदोलने आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी त्यांचा असलेला संबंध यांबाबतच्या चर्चा जेव्हा सार्वजनिक पटलावर सुरू आहेत, अशा वेळी लिमये यांची ही विधाने आली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number