जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
अमरावतीमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून 4 लाखांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.
याप्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सराफा व्यावसाय करणाऱ्या प्रदीप तारेकर यांची कार काही चोरट्यांनी फोडली आणि त्यातले दागिने लंपास केले.
चोरट्यांचा हा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.