Dumper Stuck in Pothole Nashik: नाशिकमध्ये रस्ता खचला; खडीने भरलेला डंपर थेट 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळला

गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवशा गणपती परिसरामध्ये रस्ता अचानक खचल्याने खडीने भरलेला एक मोठा डंपर तब्बल 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळला.

Dumper Stuck in Pothole Nashik: नाशिकमध्ये रस्ता खचला; खडीने भरलेला डंपर थेट 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळला

Dumper Stuck in Pothole Nashik: नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा आणि खराब दर्जाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवशा गणपती परिसरामध्ये रस्ता अचानक खचल्याने खडीने भरलेला एक मोठा डंपर तब्बल 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळला. रस्त दुरुस्तीचे काम सुरू असताना खडी उतरवण्याच्या वेळीच ही दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी भर शहरात रस्ता खचल्यामुळे महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सुदैवाने जीवितहानी टळली
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डंपर रस्त्याच्या कामासाठी खडी घेऊन आला होता. वजन जास्त असल्याने आणि नव्याने तयार केलेला रस्ता आतून पूर्णपणे खचल्याने डंपर थेट खड्ड्यात रूतला. या अपघातात चालकासह आजूबाजूचे नागरिक सुदैवाने बालंबाल वाचले. मात्र, मध्यवर्ती भागात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली असून, प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

पालकमंत्र्यांचे दावे अन् वास्तव यातील तफावत
काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर रस्त्यांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याविरोधात मोर्चाही काढला होता. दुसरीकडे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शहरातील 80 टक्के खड्डे बुजवल्याचा आणि कामाच्या गुणवत्तेचा दावा केला जात आहे. मात्र, नवशा गणपती परिसरातील या घटनेने प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे दावे पोकळ असल्याचे उघड केले आहे.

नवीन रस्त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
नाशिक शहरभरात नुकतेच तयार करण्यात आलेले अनेक नवीन रस्ते पहिल्याच पावसात किंवा काही दिवसांतच खचताना पाहायला मिळत आहेत. डंपरसारखे जड वाहन खचलेल्या रस्त्यात 10 ते 12 फूट खाली जाणे हे भ्रष्ट कारभाराचे आणि निकृष्ट कामाचे प्रतीक असल्याचा आरोप स्थानिक नाशिककर करत आहेत. ठेकेदारांवर कडक कारवाई करून शहरातील सर्व खड्ड्यांची आणि नव्याने तयार केलेल्या रस्त्यांची पाहणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number