Ritu Tawde : महापौर रितू तावडे यांच्या भोवती अडचणींचे सावट; नव्या वादात असतानाच 8 वर्ष जुनं प्रकरणही चर्चेत

महापौर रितू तावडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 2016 मधील जुनं प्रकरण आता समोर आलं आहे. 

Ritu Tawde : महापौर रितू तावडे यांच्या भोवती अडचणींचे सावट; नव्या वादात असतानाच 8 वर्ष जुनं प्रकरणही चर्चेत

आधी घड्याळ, मग मुख्यमंत्र्यांची स्थगिती असतानाही बदल्यांचं प्रकरण त्यानंतर आताच लाल दिव्याच्या गाडीवरून मुंबईच्या महापौर रितू तावडे चर्चेत आल्या होत्या. अशातच महापौर रितू तावडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 2016 मधील जुनं प्रकरण आता समोर आलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?
2016 मध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह इतर सहा जणांनी सांताक्रुझ येथील एका उर्दू शाळेतील कॅन्सरग्रस्त शिक्षकाच्या बदलीवरून शाळेत जाऊन शिक्षकांशी हुज्जत घातली होती. एवढचं नव्हे तर रितू तावडे यांनी दोन शिक्षकांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर रितू तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर स्वतःला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी रितू तावडे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. सुनावणी दरम्यान इतर साक्षीदारांनीही अर्जदार रितू तावडे यांना घटनेवेळी हजार होते अस निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं. त्यानंतर आता या बहुचर्चित 'शिक्षक मारहाण' प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे रितू तावडे यांच्या विरोधात खटला सुरूच राहणार आहे.

हेही वाचा- Shinde-Thackeray Shiv Sena Yuti : मोठी अपडेट समोर! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? दानवेंच्या 'त्या' विधानानंतर चर्चांना बळ

रितू तावडेंच्या अडचणीत भर

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवला होता. यादरम्यान भाजपने मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांचे नाव जाहीर केले. मात्र महापौर पदाची जबाबदारी घेताच रितू तावडे यांच्या अडचणी कमी व्हायचा सोडून आणखी नव्या अडचणींची भर पडत आहे. 2016 च्या बहुचर्चित 'शिक्षक मारहाण' प्रकरणातून रितू तावडे यांची सुटका झाली नसून सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापौर रितू तावडे यांना आता कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागणार आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयामुळे मोठी चर्चा सुरू झाली असून विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number