Marathi Language Mandate: रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी सरकारकडून आणखी एका महिन्याची मुदतवाढ

यापूर्वी यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली आहे.<br/>

Marathi Language Mandate: रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी सरकारकडून आणखी एका महिन्याची मुदतवाढ

Marathi Language Mandate: महाराष्ट्रातील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांसाठी व्यवहार्य मराठी भाषा बोलणे बंधनकारक करण्याच्या धोरणात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्राधिकरणाकडून देण्यात आलेली 3 महिन्यांची मुदत अपुरी ठरल्यामुळे आणि बहुतांश चालकांना अद्याप मराठीत संवाद साधणे शक्य न झाल्याने, प्रशासनाने मराठी शिकण्यासाठी आणखी 1 महिन्याची वाढीव मुदत मंजूर केली आहे. यापूर्वी यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली आहे.

मोटार वाहन नियमावलीतील सुधारणा आणि अटी
शासनाने 'मोटार वाहन नियम, 1989' मध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून राज्यातील सर्व टॅक्सी, ऑटो रिक्षा तसेच ॲप-आधारित कॅब चालकांना रोजच्या व्यवहारापुरते मराठी भाषेचे ज्ञान असणे सक्तीचे केले आहे. प्रवाशांशी सुरळीत आणि स्पष्ट संवाद साधता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल मीटर असलेल्या वाहनांच्या परवान्याचे (Permit) नूतनीकरण करताना, चालकाला मराठी भाषेची पुरेशी जाण असल्याचे परिवहन प्राधिकरणासमोर सिद्ध करणे अनिवार्य राहील.

हेही वाचा – Rohit Pawar: 'हिंमत असेल तर समोरासमोर या अन्…'; रोहित पवारांचे उदय सामंतांना ओपन चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

नियमभंग केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा
प्रशासनाने दिलेल्या या वाढीव कालावधीतही जर संबंधित चालकांनी मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान आत्मसात केले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नियम न पाळणाऱ्या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परवाना सुरुवातीला 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. तसेच, आवश्यक वाटल्यास चालक किंवा वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे. या कठोर निर्णयामुळे राज्यातील व्यावसायिक वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number