जस्लीनसोबत माझं नातं होतं बिग बॉसचा प्लॅन – अनुप जलोटा

भजन सम्राट अनुप जलोटा आणि जस्लीन मथारू या जोडीने बिग बॉसच्या 12 व्या पर्वात विचित्र जोडी म्हणून प्रवेश केला होता. पण ही जोडी आता विभक्त झाली आहे. रविवारी अनुप जलोटा घरा बाहेर झाले आहेत. घराबाहेर पडताच जलोटा यांनी बिग बॉस स्क्रिप्टेड असतं असा आरोप केला. त्याचबरोबर जस्लीनसोबत माझं नातं बिग बॉसने प्लॅन केलं होतं असाही […]

जस्लीनसोबत माझं नातं होतं बिग बॉसचा प्लॅन – अनुप जलोटा

भजन सम्राट अनुप जलोटा आणि जस्लीन मथारू या जोडीने बिग बॉसच्या 12 व्या पर्वात विचित्र जोडी म्हणून प्रवेश केला होता. पण ही जोडी आता विभक्त झाली आहे. रविवारी अनुप जलोटा घरा बाहेर झाले आहेत. घराबाहेर पडताच जलोटा यांनी बिग बॉस स्क्रिप्टेड असतं असा आरोप केला. त्याचबरोबर जस्लीनसोबत माझं नातं बिग बॉसने प्लॅन केलं होतं असाही आरोप जलोटा यांनी यावेळी केला.

बिग बॉसच्या 12व्या पर्वामध्ये विचित्र जोडी म्हणून प्रवेश केलेल्या जस्लीन मथारू आणि अनुप जलोटा यांच्या हॉट जोडीमुळे चांगलीच चर्चा रंगली. त्याचबरोबर त्यांच्या अफेअरमुळे बिग बॉसच्या 12व्या पर्वाची लोकप्रियता वाढली होती. जस्लीन आणि जलोटा यांच्यातील अनोख्य़ा नात्यामुळे घरातील इतर स्पर्धकांपेक्षा त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली.

या दोघांच्या वयातील अंतरामुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. सोशल मीडियावर देखील त्यांना चांगलचं ट्रोल करण्यात आलं होत पण आता या सगळ्या गोष्टीला पुर्णविराम देत अखेर अनुप जलोटा यांनी जस्लीनसोबतच्या त्यांच्या नात्य़ाचा खूलासा केला आहे.

बिग बॉसच्या घराबाहेर आलेल्या जलोटा यांनी बिग बॉस हा खेळ स्क्रिप्टेड असतो एवढंच नाही तर जस्लीनसोबतचं माझं नातं बिग बॉसने प्लॅन केलं होतं असा आरोप केला आहे. रविवारी झालेल्या एविक्शनमध्ये अनुप जलोटांसोबत सबा खान देखील बिग बॉसच्या घरा बाहेर पडली आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number