नागपुरात दहशतवाद्यांकडून रेकी

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैश ए मोहमद बँड टेरेरिस्ट संघटनेने रेकी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जैशकडून महत्त्वाच्या ठिकाणी रेकी केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस सज्ज झाले असून पोलिसांनी संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली आहे. तसेच ज्या ठिकाणची रेकी करण्यात आली आहे, त्या भागाची माहिती सध्या उघड केली जाणार नसल्याचे […]

नागपुरात दहशतवाद्यांकडून रेकी

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैश ए मोहमद बँड टेरेरिस्ट संघटनेने रेकी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जैशकडून महत्त्वाच्या ठिकाणी रेकी केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस सज्ज झाले असून पोलिसांनी संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली आहे. तसेच ज्या ठिकाणची रेकी करण्यात आली आहे, त्या भागाची माहिती सध्या उघड केली जाणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नागपूर आर.एस.एस. हेड क्वार्टर, हेडगेवार स्मारकसारख्या महत्वाच्या ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतील परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १७३ कलम १४४ (१),(३)प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे.

जैश ए मोहम्मद ही एक दहशतवादी घटना असून याच संघटनेच्या दहशतवाद्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिसरात रेकी केली असल्याचे तपासात समोर आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number