‘राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष भाजपात विलीन केला’

मुंबई, २९ मे २०२३, प्रतिनिधी : नितेश राणे यांनी स्वतःचा पक्ष किती दिवसात विलीन केला याचा इतिहास पाहून नंतरच शिवसेनेवर टीका करावी. असा उपरोधक टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. आगामी निवडणुकीत उद्धव गट राष्ट्रवादीत विलीन होणार असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्याला आता प्रत्युत्तर देत वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर […]

‘राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष भाजपात विलीन केला’

मुंबई, २९ मे २०२३, प्रतिनिधी : नितेश राणे यांनी स्वतःचा पक्ष किती दिवसात विलीन केला याचा इतिहास पाहून नंतरच शिवसेनेवर टीका करावी. असा उपरोधक टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

आगामी निवडणुकीत उद्धव गट राष्ट्रवादीत विलीन होणार असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्याला आता प्रत्युत्तर देत वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर टीका केली. त्यासोबत नितेश राणे यांनी इडीच्या भीतीने आपला पक्ष भाजपात विलीन केला त्यांनी आपल्या मंत्रिपदाची चिंता करावी. तसेच वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची लोकप्रियता समजेल. असा उपरोधक टोला देखील वैभव नाईकांनी लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number