7 वर्षांपासून रखडलेल्या राम मंदिर, बाबरी मशीद प्रकरणी सुनावणीला सुरुवात

वृत्तसंस्था, मुंबई अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यंदा याबाबतची सुनावणी टाळता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी सुनावणीला घाई कशासाठी केली जात आहे, जुलै 2019 […]

7 वर्षांपासून रखडलेल्या राम मंदिर, बाबरी मशीद प्रकरणी सुनावणीला सुरुवात

वृत्तसंस्था, मुंबई

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यंदा याबाबतची सुनावणी टाळता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी सुनावणीला घाई कशासाठी केली जात आहे, जुलै 2019 नंतर यावर सुनावणी व्हावी अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केली होती. हे प्रकरण गेली 7 वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर काय निकाल येईल हे कुणालाही माहीत नाही. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी झालीच पाहिजे. बाहेर काय स्थिती आहे याबाबत कोर्टाने विचार करू नये असे मुद्दे साळवे यांनी मांडले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number