Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनची भेट; 3,19.53 कोटींचा निधी वर्ग; सणापूर्वी खात्यात जमा होणार 3,000 रुपये

आगामी सणासुदीच्या कालावधीत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये एकत्रित रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनची भेट; 3,19.53 कोटींचा निधी वर्ग; सणापूर्वी खात्यात जमा होणार 3,000 रुपये

Ladki Bahin Yojana Installment:  राज्य शासनाने सामाजिक कल्याण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून निधी वळवून महिला आणि बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. सुमारे 319.53 कोटी रुपयांचा हा निधी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे आगामी सणासुदीच्या कालावधीत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये एकत्रित रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे हफ्ते एकत्र हस्तांतरित करण्याचे नियोजन प्रशासनाकडून आखले जात आहे.

उत्सव पूर्व आर्थिक दिलासा आणि दोन हप्त्यांचे एकत्र वितरण

ऑगस्ट महिन्यातील 28 तारखेला येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही जुलै महिन्याचा लाभ वितरित न झाल्याने, दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये लाभार्थी महिलांना एकाच वेळी दिले जाण्याची दाट शक्यता आहे. महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत आली असून लवकरच हे अर्थसाहाय्य थेट बँक खात्यांत जमा केले जाईल.

हेही वाचा- Mumbai Local News: मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक आरामदायक! AC लोकलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, 2027 पर्यंत….

पात्रता पडताळणी मोहीम आणि तांत्रिक सुधारणा

योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी फेब्रुवारी 2025 पासून व्यापक पातळीवर अर्जांची छाननी मोहीम राबवण्यात आली. या पडताळणी प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची अपूर्तता, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसणे आणि e-KYC न होणे यांसारख्या त्रुटींमुळे तब्बल 80 लाख महिलांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आले आहेत. नियमानुसार सर्व अटी पूर्ण करणाऱ्या पात्र महिलांना दरमहा 10 ते 15 तारखेच्या दरम्यान नियमितपणे आर्थिक लाभ दिला जाईल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number