राज ठाकरेंच नव व्यंगचित्र शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला रामराम ठोकल्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र रेखाटल आहे. आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवरुन राज ठाकरेंचं हे नवं व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आल आहे. ‘स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान […]

राज ठाकरेंच नव व्यंगचित्र शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला रामराम ठोकल्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र रेखाटल आहे. आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवरुन राज ठाकरेंचं हे नवं व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आल आहे.

‘स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान !’असे या व्यंगचित्राला नाव दिल आहे. चंद्राबाबू सत्तेतून बाहेर पडल्याने सर्वत्र शिवसेनेची चर्चा सुरु झाली. कारण शिवसेनेने याआधी अनेकदा बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्याच अनुशंघाने राज ठाकरेंने यावेळी व्यंगचित्र रेखाटले आहे. राज ठाकरेंचे हे नवं व्यंगचित्र शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेनेच्या गटातून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारेल.

 

WhatsApp_Image_2018-03-08_at_19.46.49.jpeg

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number