राज्याच्या काही भागांत पावसाच्या तुरळक सरी; कडधान्य उत्पादक चिंतेत

वृत्तसंस्था, मुंबई राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तसेच, बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानेदेखील हजेरी लावली. सध्या, कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाला असून उत्तर मध्य-महाराष्ट्रावराही चक्रवाती परिस्थिती कार्यरत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि कोकण तसंच गोवा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवलीय. उत्तर-मध्य […]

राज्याच्या काही भागांत पावसाच्या तुरळक सरी; कडधान्य उत्पादक चिंतेत

वृत्तसंस्था, मुंबई

राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तसेच, बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानेदेखील हजेरी लावली. सध्या, कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाला असून उत्तर मध्य-महाराष्ट्रावराही चक्रवाती परिस्थिती कार्यरत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि कोकण तसंच गोवा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवलीय.

उत्तर-मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, पुणे, मुंबई आणि नाशिक इथे काही प्रमाणात पाऊस पडलाय. शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता असल्याने कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असं आवाहन कृषी विभागाने केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number