मुंबई : महाराष्ट्रात मंगळवारपासून चार दिवस परतीच्या पावसाचा जोर दिसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन,त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून चार दिवस मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
मंगळवारी पावसाचा अंदाज
ऑरेंज अलर्ट – सिंधुदुर्ग, कोल्हापूर रत्नागिरी, सातारा, रायगड,बीड परभणी, नांदेड,हिंगोली.
येलो अलर्ट – उर्वरित महाराष्ट्र.