Railway Update : मोठी बातमी! इंटरसिटी अन् सिद्धेश्वर एक्स्प्रेस रद्द; काही गाड्यांचे मार्गही बदलले; जाणून घ्या टाइमटेबल

ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात रेल्वे प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणा आहे. पुणे-हडपसर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पुणे आणि हडपसर यार्डमध्ये विशेष ब्लॉक घेण्यात यणार आहे.

Railway Update : मोठी बातमी!  इंटरसिटी अन् सिद्धेश्वर एक्स्प्रेस रद्द; काही गाड्यांचे मार्गही बदलले; जाणून घ्या टाइमटेबल

ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात रेल्वे प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणा आहे. पुणे-हडपसर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पुणे आणि हडपसर यार्डमध्ये विशेष ब्लॉक घेण्यात यणार आहे. या ब्लॉकचा सोलापूर विभागातून धावणाऱ्या बऱ्याच रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. मात्र, कोणत्या दिवसापासून ते कधीपर्यंत हा ब्लॉक असणार आहे, त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये मोठे बदल
मिळालेल्या माहितीनुसार, या कामामुळे पुणे- सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत सिद्धेश्वर आणि हुतात्मा एक्स्प्रेसच्या फेऱ्यांवरही परिणाम होणार आहे, त्यामुळे गणेशोत्सवाच्या दिवसात पुणे, सोलापूर तसेच अन्य शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन हे करण्यात आलेले आहे.

हेही वाचा-Pune : शिरूरमध्ये पहाटेच रक्तरंजित थरार; गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ

ब्लॉकच्या कालावधीमध्ये काही रेल्वे गाड्यांचे मार्ग ही बदलण्यात आले असून काही गाड्या या पुणे,दौंड, लोणावळा यांसह काही स्थानके वगळून या एक्स्प्रेस धावणार आहेत. तर काही गाड्या त्यांच्या नियमित स्थानकाऐवजी दौंड, कुर्डुवाडी तसेच सोलापूर किंवा हडपसरपर्यंत धावणार आहेत.

या दिवसांत असणार ब्लॉक
पुणे-हडपसर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे
19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान पुणे आणि हडपसर यार्डमध्ये विशेष ब्लॉक घेण्यात येणा आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे पाटण-उरुळी, चिंचडव-खडकी आणि दौंड-लोणी या विभागात नियमन करण्यात येणार आहे. तर काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल केला आहे, त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेचे अद्ययावत असलेलेच वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा-Gold Rate Today: सोन्याच्या भावाने घेतला यू-टर्न; आजच्या सोनं-चांदीच्या दराने ग्राहकांना धक्का?

प्रवाशांना  रेलवन किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर गाड्यांच्या अचुक वेळा, मार्ग तसेच उपलब्ध असलेल्या सेवांची अद्ययावत माहिती तपासता येणार आहे. दरम्यान, पुणे-हडपसर तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होताच भविष्यात रेल्वे वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल.मात्र, सध्या या पायाभूत सुविधा कामांमुळे गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांना बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवास करावा लागणार आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number