कोकण आणि घाटमाथा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टीची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अस असताना रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता अधिक असल्याने रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अशातच रायगडमधील दिघी येथे मच्छिमारीसाठी गेलेल्या मच्छीमार बांधवांची बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. मच्छीमारी करताना समुद्राला आलेल्या भरतीमुळे समुद्राच्या लाठेत ही बोट उलटी झाली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, बचाव पथके आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून मच्छीमारांचा शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे यामध्ये असलेले सर्व मच्छीमार खलाशी सुखरूप असल्याची माहिती मिळत. बुडणाऱ्या खलाशांना जेटी बोट फेरी चालकांनी पाहिली असता त्यांना बचाव करून सुखरूप किनाऱ्यापर्यंत आणण्यात आले.
या घटनेमुळे दिघी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्रशासनाने मच्छीमारांसह नागरिकांना समुद्रात जाणे टाळण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान वाचवण्यात आलेल्या मच्छीमारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
1. हरिश्चंद्र नारायण भुणेशवर
2. कृष्णा लखमा पाटील
3. प्रकाश पांडुरंग झेंगर
(हे सर्वजण दिघी येथील रहिवासी आहेत.)