नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मागली तीन दिवसांपासून चौकशी होत आहे. आजही दिवसभर चौकशी झाल्यानंतर राहुल गांधी यांची गुरुवारची सुट्टी ईडीने मान्य केली आहे. मात्र, पुन्हा शुक्रवारी राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले आहे. बुधवारी सकाळपासून राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी झाली. सलग तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. सलग तीन […]
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मागली तीन दिवसांपासून चौकशी होत आहे. आजही दिवसभर चौकशी झाल्यानंतर राहुल गांधी यांची गुरुवारची सुट्टी ईडीने मान्य केली आहे. मात्र, पुन्हा शुक्रवारी राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
बुधवारी सकाळपासून राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी झाली. सलग तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. सलग तीन दिवसांनंतर राहुल गांधी यांनी गुरुवारी चौकशीला येता येणार नसल्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना गुरुवारी ईडीकडून मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची गुरुवारी चौकशी होणार नाही. तर शुक्रवारी पुन्हा राहुल गांधींना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्यात राहुल गांधी कसे ?
यंग इंडिया कंपनीमध्ये राहुल आणि सोनिया यांचा प्रत्येकी ३८ टक्के हिस्सा.
यंग इंडियाला एजेएल कंपनीकडून ९ कोटींचे समभाग.
समभागच्या बदल्यात यंग इंडियाने कर्ज चुकवण्याचे वचन दिले.
समभागासोबत यंग इंडियाला नेशनल हेरॉल्डचे मालकी हक्क मिळाले.
कर्ज फेडण्यासाठी एजेएलला काँग्रेसने ९० कोटी दिले आणि नंतर कर्जमाफीही दिली.
नॅशनल हेरॉल्ड घोटाळा नक्की कसा?
१९३८ – काँग्रेसनं एजेएल कंपनीची स्थापना केली.
नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र नेहरु यांनी सुरू केलं होतं.
हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं.
काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं.
२०१२ मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीनं या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं.
काँग्रेसनं स्वत:च्या तिजोरीतले पैसे यासाठी वापरले.
हक्क विकत घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.