वृत्तसंस्था, नवी दिल्ली गुजरात विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर निघाले आहेत. शनिवारी ते गुजरातमध्ये पोहोचले. यावेळी राहुल गांधींनी सर्वप्रथम गुजरातच्या सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतले. सोमनाथ मंदिरात पूजादेखील केली. त्यानंतर गुजरातमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे 77 आमदार आणि पक्षनेत्यांसह ते बैठकही घेणार आहेत.