जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर ‘अभाविप’कडून राडा

म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही त्याठिकाणी पोहोचले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत अभाविपच्या आंदोलकांना ताब्यात घेतले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना जर काही शंका होत्या तर त्यांनी माझी वेळ घ्यायला हवी होती. मी त्यांना खुल्या मानाने इथे […]

जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर ‘अभाविप’कडून राडा

म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही त्याठिकाणी पोहोचले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत अभाविपच्या आंदोलकांना ताब्यात घेतले.

‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना जर काही शंका होत्या तर त्यांनी माझी वेळ घ्यायला हवी होती. मी त्यांना खुल्या मानाने इथे बोलावून चहा पाजून चर्चा केली असती’, असे मंत्री आव्हाडांनी सांगितले.

१२ डिसेंबर रोजी म्हाडाची परीक्षा होणार होती. विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठ जोरदार तयारीसुद्धा केली होती. मात्र म्हाडाच्य परिक्षेचा पेपरफुटीच्या संशयामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

त्यामुळे म्हाडाच्या परिक्षेच्या दिवशीच परिक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

अभविप च्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच म्हाडा परिक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड  यांनी राजीनामी दिला पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number