Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांवर नो-पार्किंग, असा असेल पीएमपीच्या बसचा मार्ग

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या मूर्तींचे वाजतगाजत आगमन आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता रविवार आणि सोमवारसाठी मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांवर नो-पार्किंग, असा असेल पीएमपीच्या बसचा मार्ग

Pune Traffic Changes Update for Bappa Agaman: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या मूर्तींचे वाजतगाजत आगमन आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी आज (रविवार) आणि उद्या (सोमवार) शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग आणि मुंढव्यातील केशवनगर परिसरातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. गाडगीळ पुतळा चौक ते गोटीरामभय्या चौक हा मार्ग बंद राहणार असून, वाहनचालकांना संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक आणि शाहीर अमर शेख चौकामार्गे पुढे जावे लागेल.

मध्य भागातील बंद असणारे मार्ग आणि पर्यायी वाहतूक
गणपती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी पुण्यातील मध्य भागातील वाहतूक पूर्णपणे वळवण्यात आली आहे:
– शिवाजीनगर ते स्वारगेट: या मार्गावरील वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक आणि टिळक रस्ता मार्गे स्वारगेटकडे मार्गस्थ होतील.
– इतर बंद रस्ते: कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक आणि मंगला चित्रपटगृहासमोरील रस्ता वाहतुकीस बंद असेल.
– कुंभारवेस मार्ग: झाशीची राणी पुतळा चौक व खुडे चौकामार्गे कुंभारवेसकडे जाणारी वाहने छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून प्रवास करतील.

सारसबाग व केशवनगर परिसरातील पार्किंग नियम व वाहतूक वळण
सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ केंद्रादरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक सुरू असली, तरी पार्किंगवर कडक बंदी घालण्यात आली आहे:
– पार्किंगच्या जागा: भाविक आपली वाहने मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक (डावी बाजू) किंवा नीलायम चित्रपटगृहाजवळ उभी करू शकतात.
– केशवनगर (मुंढवा) वळण: शिवाजी महाराज चौकातून मांजरीकडे जाणारी वाहने गायरान वस्ती रस्ता व विहान सोसायटीमार्गे जातील. तर खराडी पुलाकडून येणारी वाहने रेणुकामाता मंदिर आणि विहान सोसायटी रस्त्याने मार्गस्थ होतील.
– जड वाहनांवर बंदी: मुंढवा चौक, शिवाजी महाराज चौक ते कल्याणी बंगला, झेड कॉर्नर आणि केशवनगर परिसरात जड वाहनांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी असेल.

पीएमपी (PMPML) बस मार्गांमध्ये करण्यात आलेले बदल
वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वाहतूक सुलभ ठेवण्यासाठी पीएमपी बसच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत:
– शिवाजीनगर ते स्वारगेट पीएमपी बस: स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना आणि टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जातील.
– मनपा भवन ते स्वारगेट: महापालिका भवन परिसरातून सुटणाऱ्या पीएमपी बसेस जंगली महाराज रस्त्याचा वापर करतील.

नो-पार्किंग व वाहनतळासाठी निश्चित केलेले परिसर
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने खालील परिसर नो-पार्किंग अथवा विशिष्ट वापरासाठी घोषित केले आहेत:
– नो-पार्किंग / मार्ग बदल: कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा, वीर संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा चौक, टिळक पूल ते भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता.
– पार्किंग सुविधा: मंडईतील वाहनतळ आणि छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक (फक्त डावी बाजू) येथे वाहने पार्क करता येतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number