Anganwadi Sevika: पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा उघड करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच प्रशासनाची कारवाई; निलंबनानंतर व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला असंतोष

अन्नाचा दर्जा सुधारण्याऐवजी किंवा प्रशासकीय पाहणी करण्याऐवजी, व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून संबंधित अधिकाऱ्यांनी या सेविकेचे थेट निलंबन केले गेले आहे.

Anganwadi Sevika: पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा उघड करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच प्रशासनाची कारवाई; निलंबनानंतर व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला असंतोष

Anganwadi Sevika Suspension: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शालेय पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा उघडकीस आणणाऱ्या एका प्रामाणिक अंगणवाडी सेविकेवरच प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. देवयानी पारधी असे कारवाई झालेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. या कारवाईनंतर अंगणवाडी सेविकेने आपल्यावर अन्याय होत असल्याची व्यथा  व्हिडिओतून मांडली आहे. अंगणवाडीत पुरवला जाणारा कच्चा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, देण्यात आलेला पांढरा वाटाणा 9 ते 10 शिट्ट्यांनंतरही शिजत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

या सत्य परिस्थितीबाबत देवयानी पारधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओद्वारे त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना अशा निकृष्ट दर्जाच्या अन्नावर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन केले होते. परंतु, अन्नाचा दर्जा सुधारण्याऐवजी किंवा प्रशासकीय पाहणी करण्याऐवजी, व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून संबंधित अधिकाऱ्यांनी या सेविकेचे थेट निलंबन केले.

हेही वाचा – New Born Baby Girl : काळीज पिळवटून टाकणारी घटना, नवजात बालिकेला उघड्यावर बेवारस सोडलं; पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही या अंगणवाडी सेविकेचा व्हिडिओ शेअर करत सरकारला सवाल केला आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देणारं वाह रे सरकार! अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. ‘व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय? अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी. गैरप्रकारावर आवाज उठवाल तर कारवाई करू, हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचाय का?’ असा सवाल रोहित पवार यांनी एक्स पोस्टमधून केला आहे.

या अन्यायकारक कारवाईवर व्यथा व्यक्त करताना देवयानी पारधी यांना अश्रू अनावर झाले. आपण अंगणवाडीतील मुलांना पोटच्या लेकरासारखे जपून काम करत असतानाही कामावरून काढण्याची नोटीस देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. ‘प्रशासनाला प्रामाणिक काम करणाऱ्यांपेक्षा खोटे काम करणाऱ्यांचीच गरज आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या तणावामुळे आपल्याला काही बरेवाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ICDS च्या अधिकाऱ्यांची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number