Sanjay Raut : ‘मोदींच्या चहा विकण्याचा पुरावा द्या…’; संजय राऊतांचे भाजपला खुलं आव्हान

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका करत चहा विकण्याच्या दाव्यावर उघड आव्हान दिले आहे.

Sanjay Raut : ‘मोदींच्या चहा विकण्याचा पुरावा द्या…’; संजय राऊतांचे भाजपला खुलं आव्हान

Sanjay Raut :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील चहा विकण्याच्या दाव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका करत चहा विकण्याच्या दाव्यावर उघड आव्हान दिले आहे. यावर भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देत राऊतांच्या राजकीय वाटचालीवर आणि वैयक्तिक पार्श्वभूमीवर गंभीर आरोप केले आहेत.

‘गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच नव्हते’ – संजय राऊतांचा सवाल

खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चहा विकण्याच्या दाव्यावर जोरदार निशाणा साधला. “ज्या काळात नरेंद्र मोदी गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते असा दावा केला जातो, त्या काळात म्हणजे 1971 च्या आसपास गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशन किंवा प्लॅटफॉर्म अस्तित्वातच नव्हते. मग मोदींनी चहा कुठे विकला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना राऊतांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आणि म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा एक जरी पुरावा कोणी आणून दिला, तर मी राजकीय संन्यास घेईन आणि राजकारण सोडून देईन.”

हेही वाचा – Maratha Aarakshan: मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकार धास्तावलं; 3 मंत्री अन् एका आमदाराची अंतरवाली सराटीत धाव

‘राऊतांना पोटात जंत झालेत, त्यांनी उपाययोजना करावी’ – नवनाथ बन

राऊतांच्या या आव्हानाचा भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी खरमरीत शब्दांत समाचार घेतला. नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी लहानपणी वडनगर स्टेशनवर चहा विकला होता, हे गुजरातच्या जनतेला आणि त्यांच्या बालपणीच्या मित्रांना माहीत आहे. राऊतांच्या दाऊदची कॉलर पकडण्याच्या दाव्यावर निशाणा साधत बन म्हणाले, “संजय राऊतांनी दाऊदची कॉलर पकडल्याची कोणतीही दंतकथा सांगण्यापेक्षा स्वतःची काळीकृत्ये महाराष्ट्राला सांगावीत. राऊतांच्या पोटात जास्त जंत झाले आहेत, त्यांनी आधी त्यावर योग्य उपाययोजना करावी.”

‘घराणेशाहीविरुद्ध सर्वसामान्यांचे नेतृत्व’ आणि भांडुपचा उल्लेख

काँग्रेस आणि ठाकरे गटावर हल्लाबोल करताना नवनाथ बन यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका केली. “काँग्रेसमध्ये केवळ एकाच कुटुंबाला संधी दिली जाते, तर भाजप सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे करतो. देवेंद्र फडणवीस हे तरुणांना सोबत घेऊन पुढे जाणारे नेते आहेत आणि 2029 च्या निवडणुकीतही नवमतदार (Gen-Z) भाजपलाच कौल देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच संजय राऊतांवर वैयक्तिक टीका करताना बन म्हणाले, “संजय राऊत पूर्वी भांडुपच्या नाक्यावर बसून जुगाराच्या अड्ड्यावर दलाली करत होते आणि दलाली करूनच राजकारणात आले आहेत. याउलट, ऑटो रिक्षा चालवणारे आणि सर्वसामान्य कुटुंबातील लोक आज भाजपमध्ये मंत्री पदावर पोहोचले आहेत.”
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number