जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. मुख्यमंत्र्यांकडून प्रमुख मागण्यांना बगल दिली जात असल्याची टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर
केली.
शेतकरी संपात सरकार फूट पाडली असल्याची टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी असून लोकशाही मार्गानं शेतकऱ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
ही सरकारची दडपशाही सुरु असल्याची टीका देखील त्यांनी केली.