विद्यार्थिनीचं विनयभंग करणाऱ्या विकृत मुख्याध्यापकाला चोपलं

१४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीशी वर्गात विकृत चाळे करणाऱ्या आणि चुंबनाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी चोप दिला आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथील एका हिंदी शाळेत घडला आहे. येथील जीवन ज्योती हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमाची कबुली देत चुंबनाची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या नातेवाईकांनी शाळेच्या आवारात धाव घेतली. […]

विद्यार्थिनीचं विनयभंग करणाऱ्या विकृत मुख्याध्यापकाला चोपलं

१४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीशी वर्गात विकृत चाळे करणाऱ्या आणि चुंबनाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी चोप दिला आहे.

हा प्रकार भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथील एका हिंदी शाळेत घडला आहे.

येथील जीवन ज्योती हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमाची कबुली देत चुंबनाची मागणी केली.

या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या नातेवाईकांनी शाळेच्या आवारात धाव घेतली.

नातेवाईकांनी या विकृत मुख्याध्यापकाला बेदम चोप देला. यानंतर नातेवाईकांनी या विकृताला पोलिसांच्या स्वाधीन केले.

या विकृत मुख्याधापकाला ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या विकृतावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद नायक (३५) असे विकृत मुख्याध्यापकाचे नाव आहे.

भिवंडी तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पीडित १४ वर्षाची विद्यार्थीनी १० वीचे शिक्षण घेत आहे.

या विकृत मुख्याध्यापकाने, काही दिवसांपूर्वी पीडितेवर एकतर्फी प्रेम करत असल्याची कबुली मुलीला दिली होती.

मुख्याध्यापकाने ३ दिवसांपूर्वी पीडितेला शाळेच्या मैदानात गाठून मुख्याध्यापक कार्यलयात यायला सांगितलेले. मात्र ती विद्यार्थीनी गेली नाही.

यानंतर पुन्हा, वर्गात कोणी नसल्याचा फायदा त्या विकृत मुख्यध्यापकाने घेतला. त्याने विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला.

हा घडलेला प्रकार त्या पीडित विद्यार्थीनीने आईला सांगितला. यानंतर आईने शाळा गाठून शाळेच्या आवारातच शिक्षकाला चोप दिला.

यानंतर पोलिसांच्या हवाली केले. मुख्याध्यापकाविरोधात तालुका पोलीस स्टेशनमध्ये 354 अ,354 (1),354(2),354(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी मुख्याधापकाला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number