मुंबई – गोवा महामार्गावरील आंदोलन मनसेला भोवले

पनवेल, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गावरील आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधला हातिवले टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी १६ मनसे कार्यकत्यांना अटक केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ९७ मनसैनिकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिस कायदा कलम ६८ अंतर्गत ही कारवाई करण्यात […]

मुंबई – गोवा महामार्गावरील आंदोलन मनसेला भोवले

पनवेल, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गावरील आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधला हातिवले टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी १६ मनसे कार्यकत्यांना अटक केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ९७ मनसैनिकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिस कायदा कलम ६८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. खेड शहरात २० मनसैनिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

याआधी मुंबई – गोवा महामार्गाच्या दूरवस्थेप्रकरणी मनसेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पनवेल येथे निर्धार मेळावा घेऊन या आंदोलनाला हिरवा कंदिल दाखवला होता. आंदोलन सुरू केल्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड सुरू केली. या प्रकरणात पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number