PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलात सुरक्षेचा भंग; बनावट आयडी आणि शस्त्रासह तिघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडक व्यवस्था असताना तीन जण सुरक्षाव्यवस्था भेदून जबरदस्तीने या ठिकाणी वावरत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलात सुरक्षेचा भंग; बनावट आयडी आणि शस्त्रासह तिघांना अटक

PM Modi Mumbai visit security breach BKC: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) जिओ वर्ल्ड प्लाझा आणि नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन जणांचा सुरक्षारक्षकांनी पकडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडक व्यवस्था असताना हा प्रकार उघडकीस आला. स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) अधिकारी सांगणाऱ्या 24 वर्षीय तरुणासह त्याच्या सशस्त्र अंगरक्षकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात सरकारी अधिकाऱ्याचे बनावट रूप धारण करणे आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगून प्रवेश करणे या कलमांखाली गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे.

बनावट ओळखपत्र अन् परवाना असलेले शस्त्र; गुन्हे शाखेकडून सखोल तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी सुरक्षारक्षकांना चकवून मॉलमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. संशय आल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाचे संशयास्पद ओळखपत्र आढळले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकाकडे एक बंदूक होती, जी नंतर परवानाधारक असल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आला असून, त्यांच्याकडे आढळलेल्या बनावट ओळखपत्राबाबत कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray On DJ Ban: ऐन गणेशोत्सवात 'डीजे'वरून राजकारण तापले; उद्धव ठाकरेंनी प्रशासकीय गोंधळावर बोट ठेवत सुचवला 'हा' पर्याय

'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026'साठी पंतप्रधान मोदी मुंबईत
मुंबईत 8 ते 11 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या 'ग्लोबल फिनटेक फेस्ट' (GFF) 2026 या जागतिक परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या 7 व्या आवृत्तीच्या कार्यक्रमात जागतिक वित्त क्षेत्रातील धोरणकर्ते, मध्यवर्ती बँका, तंत्रज्ञान कंपन्या आणि गुंतवणूकदार सहभागी होत आहेत. या परिषदेत एजेंटिक एआय (Agentic AI), प्रोग्रामेबल फायनान्स आणि क्वांटम तंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयांवर चर्चा होणार आहे. 2020 पासून सुरू झालेल्या या परिषदेने भारताला जागतिक वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रगण्य स्थान मिळवून दिले आहे.  

गुजरातमधील 35,000 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण
मुंबई दौऱ्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदरा येथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर नवसारी येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सत्तेच्या अहंकारापेक्षा सेवेच्या समर्पणावरच या भागात पक्षाचे स्थान दीर्घकाळ टिकून राहिल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा – Manoj Jarange Patil : 'वेळ आली तर राजीनामा दिला पाहिजे'; जरांगेंची विखे पाटलांवर जोरदार टीका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number