Pimpri Chinchwad Crime: पहाटे दोघांची भेट झाली, नेमकी तीच गोष्ट घडली अन् तिसऱ्याने साधला डाव; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

14 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास ते जाधववाडी ओलियो हॉटेलजवळ आले होते. त्याचवेळी त्यांचा आरोपींसोबत असलेल्या जुन्या आर्थिक व्यवहारावरुन वाद झाला. क्षणातच हा वाद वाढत गेला

Pimpri Chinchwad Crime: पहाटे दोघांची भेट झाली, नेमकी तीच गोष्ट घडली अन् तिसऱ्याने साधला डाव; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणावर गोळीबार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाधववाडी परिसरातील ओलियो हॉटेलजवळ ही घटना घडली. या घडलेल्या घटनेप्रकरणी चिखली पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणीत पोलिसांनी स्वप्नील कांताराम जाधव आणि त्याचा चालक रोशन पिंगळे यांना तातडीने ताब्यात घेतले आहे.

दोघं भेटले, वाद वाढला अन्
तक्रारदार, रवी धनाजी घोगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  14 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास ते जाधववाडी ओलियो हॉटेलजवळ आले होते. त्याचवेळी त्यांचा आरोपींसोबत असलेल्या जुन्या आर्थिक व्यवहारावरुन वाद झाला. क्षणातच हा वाद वाढत गेला आणि आरोपी स्वप्नील जाधव याने घोगरे यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यानंतर स्वप्नील याने पिस्तूलातून घोगरे यांच्या दिशेने गोळी झाल्याचे तक्रारीत सांगण्यात आलेले आहे. याच गोळीबारात रवी घोगरे हे गंभीर जखमी झाले होते.  त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा-Jalgaon Crime : हृदयद्रावक! ऐन गणपतीच्या सणाला आपल्या मुलासह महिलेनं उचललं टोकाचं पाऊल; परिसरात हळहळ व्यक्त

घटनेनंतर चिखली पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटकही केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी घटनेत वापरलेले लोखंडी पिस्तूल, जिवंत राऊंड, वाहन आणि मोबाईल जप्त केले असून पोलीस निरीक्षक अमोल फडतरे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number