Pune DJ Permission: पुण्यात गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसांत ‘डीजे’ला परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत डीजे (DJ) आणि लाऊडस्पीकर वाजवण्यास प्रशासनाकडून विशेष परवानगी देण्यात आली आहे.

Pune DJ Permission: पुण्यात गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसांत ‘डीजे’ला परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Pune DJ Permission: पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी आणि गणेश मंडळांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत डीजे (DJ) आणि लाऊडस्पीकर वाजवण्यास प्रशासनाकडून विशेष परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला असून गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, डीजेच्या कडक विरोधात असलेले पुण्याचे जागरूक नागरिक विद्यानंद बापट यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

‘या’ 5 दिवसांसाठी विशेष मुभा

प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, यंदाच्या उत्सवातील 19, 20, 22, 23 आणि 25 सप्टेंबर या 5 निश्चित केलेल्या दिवसांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि डीजे वाजवण्यास मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुख्य विसर्जन मिरवणुकीसह उत्सवाच्या अंतिम टप्प्यात मंडळांना रात्री उशिरापर्यंत उत्सव साजरा करता येणार आहे. मात्र, डीजे आणि लाऊडस्पीकरला परवानगी दिली असली, तरी न्यायालयाने आणि प्रशासनाने ठरवून दिलेली आवाजाची डेसिबल मर्यादा (Decibel Limit) पाळणे सर्व गणेश मंडळांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे. या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्यास पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाईल आणि संबंधित साहित्य जप्त केले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – Gauri Avahan 2026: गौरी आवाहन, गौरी पूजन म्हणजे काय? शुभ मुहूर्त, पूजेची विधी आणि गौरीचा नैवेद्य जाणून घ्या..

इतर जिल्ह्यांत डीजेवर बंदी

पुण्यात डीजेला रात्री 12 वाजेपर्यंत सशर्त परवानगी मिळाली असली, तरी राज्याच्या इतर काही महत्त्वाच्या भागांत प्रशासनाने वेगळी भूमिका घेतली आहे. सोलापूर, धुळे आणि नवी मुंबई यांसारख्या शहरांमध्ये डीजेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून तेथे पारंपारिक वाद्यांचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पुण्यात बापटांचा विरोध ठरला निष्फळ

पुण्यात डीजेच्या अतिवापरामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरुद्ध आणि आरोग्यावरील दुष्परिणामांविरुद्ध जागरूक नागरिक विद्यानंद बापट यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. डीजेला परवानगी नाकारली जावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि राज्यात या विषयावर मोठी चर्चाही रंगली होती. मात्र, प्रशासनाच्या या नव्या आदेशामुळे बापटांच्या भूमिकेला धक्का बसला असून, पुणेकरांनी नियमांचे भान ठेवून शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number