वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने अखेर व्हिसा जारी केला आहे. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानात 25 डिसेंबर रोजी ही भेट होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यालयाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.