Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! घरच्या अंगणात वृद्धाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दीर्घकाळ पॅरालिसिसच्या आजाराने त्रस्त असलेल्या 50 वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या अंगणात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! घरच्या अंगणात वृद्धाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथे बुधवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीर्घकाळ गंभीर आजाराशी संघर्ष करणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या अंगणात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मृत व्यक्तीची ओळख नानासाहेब भाऊसाहेब आगलावे (वय 50) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला होता. प्रकृतीतील बिघाडामुळे आणि दीर्घकाळ सुरू असलेल्या उपचारांमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या अंगावर दारू ओतून पेटवलं; जळगावात थरकाप उडवणारी घटना

मंगळवारी रात्री त्यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे विश्रांती घेतली. मात्र, बुधवारी पहाटे ते घराबाहेर आल्याचे लक्षात आले. काही वेळाने घराच्या अंगणातील लिंबाच्या झाडाला त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही बाब समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Crime News : सामान पॅकिंगच्या बहाण्याने घरी बोलावून पीएचडीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी डिलिव्हरी बॉयला अटक

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number