सरकारच्या 210 वेबसाइटवरून आधार लाभार्थींची माहिती लीक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई केंद्र आणि राज्य सरकारच्या सुमारे 210 वेबसाइटवरून आधार डेटा लीक झाल्याचे समोर आले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच युआयडीएआयने आधार लाभार्थींचा डेटा लीक झाल्याचे मान्य केले आहे. माहिती लीक झाल्याचे माहिती अधिकारांतर्गत आलेल्या अर्जावरील उत्तरात नमूद करण्यात आले आहेत. दरम्यान, युआयडीएआयने वेबसाइटवरून आधारशी संबंधित डेटा हटवला आहे. युआयडीएआयकडून आधार डेटा […]

सरकारच्या 210 वेबसाइटवरून आधार लाभार्थींची माहिती लीक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

केंद्र आणि राज्य सरकारच्या सुमारे 210 वेबसाइटवरून आधार डेटा लीक झाल्याचे समोर आले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच युआयडीएआयने आधार लाभार्थींचा डेटा लीक झाल्याचे मान्य केले आहे. माहिती लीक झाल्याचे माहिती अधिकारांतर्गत आलेल्या अर्जावरील उत्तरात नमूद करण्यात आले आहेत. दरम्यान, युआयडीएआयने वेबसाइटवरून आधारशी संबंधित डेटा हटवला आहे.

युआयडीएआयकडून आधार डेटा सार्वजनिक करण्यात आलेला नसून काही शैक्षणिक संस्था आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सुमारे 210 वेबसाइटवरून आधार लाभार्थींची नावे, पत्ते आणि अन्य माहिती सार्वजनिक करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number