Ashadi Ekadashi 2026 : मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; धाराशिवचे शेतकरी दाम्पत्य बनले ‘मानाचा वारकरी’

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त आज, शनिवारी पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा मेळा जमलेला असतानाच शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणी यांची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांची पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. तर यंदाचा मानाच्या वारकऱ्यांचा मान धाराशीवचे माने दाम्पत्य यांना मिळाला. बाळासाहेब आणि पत्नी प्रभावती माने यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. […]

Ashadi Ekadashi 2026 : मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; धाराशिवचे शेतकरी दाम्पत्य बनले ‘मानाचा वारकरी’

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त आज, शनिवारी पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा मेळा जमलेला असतानाच शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणी यांची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांची पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. तर यंदाचा मानाच्या वारकऱ्यांचा मान धाराशीवचे माने दाम्पत्य यांना मिळाला. बाळासाहेब आणि पत्नी प्रभावती माने यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. दरम्यान, देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त, आज श्री क्षेत्र पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल आणि माता श्री रुक्मिणी यांची अधिकृत महापूजा व अभिषेक संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे सुख-समृद्धी, शेतकऱ्यांची भरभराट आणि प्रत्येक नागरिकाचे मंगलमय जीवन यासाठी विठ्ठल-माऊलीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

हेही वाचा : Ashadi Ekadashi Upvas Special : आषाढी एकादशीच्या उपवासाला यंदा या नवनवीन आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या; बनवायलाही आहेत सोपे

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भक्ती, श्रद्धा आणि लाखो वारकऱ्यांच्या मुखातून होणारा विठ्ठलनामाचा अखंड गजर यांचा हा उत्सव. आज श्री क्षेत्र पंढरपूर येथे, विठ्ठल-रुक्मिणीच्या भव्य पूजेचा मान आम्हाला मिळाला. विठुरायाच्या चरणांशी व्यतीत केलेला प्रत्येक क्षण शब्दांत मांडणे अशक्य आहे.  आम्ही विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने प्रार्थना केली. तसेच पाऊस बरसो, पिके बहरून येवोत,  हे पांडुरंगा, महाराष्ट्र सुखी-समृद्ध होवो, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, माता-भगिनी, युवावर्ग आणि प्रत्येक नागरिकाचे सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व मंगलमय भवितव्य यासाठी मी प्रार्थना केली. तसेच, बळीराजाचे प्रयत्न यशस्वी होवोत आणि महाराष्ट्र सदैव प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहो, अशी प्रार्थनाही विठ्ठलाच्या चरणी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number