भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीने दिलासा दिला आहे. कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली आहे. तर येत्या येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे आणि सहआरोपी राकेश परबला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. तसेच पोलीस नितेश राणेंना घेऊन सावंतवाडी तुरुंगाकडे रवाना झाले आहेत.
भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज नितेश राणे यांची पोलीस कोठडीची मुदत संपली आहे. आज नितेश राणे यांना आज कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. संतोष परब हल्लाप्रकरणी पोलिसांनी नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची एकत्रित चौकशी करण्यात आली. दरम्यान आज याप्रकरणी नितेश राणे आणि सहआरोपी राकेस परबला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.