Nirmala Nawale: ZP निवडणुकीतील पराभवानंतर निर्मला नवलेला पक्षाकडून पाठबळ; ‘या’ पदावर केली नियुक्ती

अलिकडेच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मनिषा पाचंगे यांच्याकडून नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Nirmala Nawale: ZP निवडणुकीतील पराभवानंतर निर्मला नवलेला पक्षाकडून पाठबळ; ‘या’ पदावर केली नियुक्ती

Nirmala Nawale: सोशल मीडियावर आपल्या सक्रीयतेमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कारेगावच्या माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या निर्मला नवले यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. 

अलिकडेच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मनिषा पाचंगे यांच्याकडून नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, या पराभवानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. आता आगामी काळात संपूर्ण राज्यात पक्षाच्या युवती संघटनेची बांधणी करणे आणि नेटवर्क मजबूत करणे हे त्यांच्यापुढील मुख्य आव्हान असणार आहे.

'देवगिरी' बंगल्यावर सुनेत्रा पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी गुरुवारी निर्मला नवले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नवले या उच्चशिक्षित असून त्यांनी 2021 मध्ये कारेगावच्या सरपंचपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. 

हेही वाचा – Vinod Tawde : त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा; खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

इन्स्टाग्राम आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांचे फोटो व व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय आहेत. काही काळापूर्वी पतीने भेट दिलेल्या महागड्या गाडीचा आनंद व्यक्त करणारा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला होता. दरम्यान, आता या नव्या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number