Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रासाठी पुढील 72 तास महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार सरी कोसळतील.

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रासाठी पुढील 72 तास महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार सरी कोसळतील. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा अंदाज

विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून तेथील अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत. या पावसामुळे शेती पिकांना नवा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, विजा चमकत असताना नागरिकांनी मोकळ्या जागेत किंवा झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Dharashiv Viral Video : बाप्पाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा! पाथरूडमध्ये गणपती बाप्पाचा ‘चमत्कार’ पाहण्यासाठी भाविकांची झुंबड; व्हिडीओ चर्चेत

10 सप्टेंबरनंतर मान्सून ओसरण्याची शक्यता; मध्यंतरी पाऊस सुरूच राहणार

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 3 सप्टेंबर दरम्यानचा जोर ओसरल्यानंतरही पावसाची रिमझिम पूर्णपणे थांबणार नाही. 3 ते 10 सप्टेंबर दरम्यान कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसत राहतील. मात्र, 10 सप्टेंबरनंतर राज्यातील पावसाचा एकूण जोर कमी होण्यास सुरुवात होईल आणि मान्सून माघारीचे संकेत मिळतील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number