Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला 93 दिवसांनंतर नवे वळण; पुणे पोलिसांकडून न्यायालयात 2 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

सुरुवातीला या गुन्ह्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न आरोपींकडून झाला होता, मात्र तपासादरम्यान पोलिसांना या कारस्थानाचा सुगावा लागला

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला 93 दिवसांनंतर नवे वळण; पुणे पोलिसांकडून न्यायालयात 2 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

Ketan Agarwal Case:  संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अखेर मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. घटनेच्या तब्बल 93 दिवसांनंतर, म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात तब्बल 2 हजारहून अधिक पानांचे भक्कम दोषारोपपत्र (Charge-sheet) न्यायालयात सादर केले आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून होणाऱ्या नवऱ्याला, म्हणजेच केतनला ढकलून देऊन त्याला संपवलं होतं. सुरुवातीला या गुन्ह्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न आरोपींकडून झाला होता, मात्र तपासादरम्यान पोलिसांना या कारस्थानाचा सुगावा लागला आणि त्यांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

सीडीआर, सीसीटीव्ही अन् डिलीट केलेला डेटा रिकव्हर 

पोलीस तपासात या गुन्ह्याचे अत्यंत धक्कादायक आणि थरारक पैलू समोर आले आहेत. आरोपींनी हत्येची योजना आखण्यापूर्वी आणि अटकेनंतर पोलिसांच्या चौकशीतून कसे वाचायचे, यासाठी इंटरनेटवर विशेष सर्च केले होते. पोलिसांनी डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला असून, यामध्ये हत्येच्या अवघ्या दोन तास आधी आरोपींनी गुन्ह्याशी संबंधित जपानी व्हिडिओ पाहिल्याचे समोर आले आहे. याशिवाय, केतन आणि सिया यांच्यातील मोबाईल चॅटिंग, कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR), घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीचे निष्कर्ष या चार्जशीटमध्ये मुख्य पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.

हेही वाचा – Crime : आजोबांना ठार करुन अंत्यसंस्कारही उरकले! 17 वर्षीय नातीचा बॉयफ्रेंडसोबत मिळून कट; अखेर कपडे धुताना….

लोहगडावरील ‘सीन रिक्रिएशन’मुळे पोलिसांची केस मजबूत 

तपासाचा एक भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ‘सीन रिक्रिएशन’ केले होते. या प्रयोगातून हत्येचा बनाव आणि प्रत्यक्षात घडलेला प्रकार यातील फरक स्पष्ट झाला, ज्यामुळे पोलिसांना भक्कम पुरावे गोळा करता आले. सुरुवातीपासूनच बचावाचे मार्ग शोधणाऱ्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या अडचणी आता अत्यंत वाढल्या आहेत. 2 हजार पानांच्या या विस्तृत दोषारोपपत्रामुळे आरोपींवर न्यायालयात कठोर कलमांन्वये खटला चालवला जाऊन पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number