‘मविआमधील नवीन घोटाळा उघड करणार’ – किरीट सोमैया

आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया नॉट रिचेबल होते. मात्र, काल याप्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानतंर ते मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आज सोमैयांनी मविआ सरकारला इशारा दिला आहे. मविआ सरकारमधील आणखी एक नवीन घोटाळा उघडकीस करणार असल्याचा इशारा, सोमैयांनी दिला आहे. किरीट सोमैया म्हणाले, ठाकरे सरकारमधील एक डझन लोकांची प्रॉपर्टी […]

‘मविआमधील नवीन घोटाळा उघड करणार’ – किरीट सोमैया

आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया नॉट रिचेबल होते. मात्र, काल याप्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानतंर ते मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आज सोमैयांनी मविआ सरकारला इशारा दिला आहे. मविआ सरकारमधील आणखी एक नवीन घोटाळा उघडकीस करणार असल्याचा इशारा, सोमैयांनी दिला आहे.

किरीट सोमैया म्हणाले, ठाकरे सरकारमधील एक डझन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ यांच्यासह इतर नेत्यांची संपत्ती अटॅच झाली आहे, असे सोमैया म्हणाले.

सोमैयांना न्यायालयाकडून दिलासा

‘विकांत वाचवा’ निधीप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच सोमवारी १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही सोमय्यांना दिले आहेत.

‘सोमय्या पिता-पुत्र तुरुंगात जाणारच’ – संजय राऊत

दरम्यान, सोमैया पिता-पुत्र तुरुगांत जाणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमैया यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number