राणीच्या बागेतील नवजात पेंग्विनचा दुर्दैवी अंत

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई भारतात पहिल्यांदाच जन्माला आलेल्या पेंग्विनचा अवघ्या काही दिवसांतच मृत्यू झाला आहे. मुंबईच्या जिजामाता उद्यानात जन्माला आलेल्या पेंग्विनबद्दल सा-यांनाच कौतुक होतं. मात्र या पिल्लाचा 22 ऑगस्टलाच दुर्दैवी अंत झाला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आज या पिल्लाचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालानुसार यकृत खराब झाल्यामुळे या नवजात पिल्लाचा मृत्यू झाला. […]

राणीच्या बागेतील नवजात पेंग्विनचा दुर्दैवी अंत

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

भारतात पहिल्यांदाच जन्माला आलेल्या पेंग्विनचा अवघ्या काही दिवसांतच मृत्यू झाला आहे. मुंबईच्या जिजामाता उद्यानात जन्माला आलेल्या पेंग्विनबद्दल सा-यांनाच कौतुक होतं. मात्र या पिल्लाचा 22 ऑगस्टलाच दुर्दैवी अंत झाला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आज या पिल्लाचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालानुसार यकृत खराब झाल्यामुळे या नवजात पिल्लाचा मृत्यू झाला.

हम्बोल्ट पेंग्विनच्या जोडप्याने या पिल्लाला जन्म दिला होता. भारतात पहिल्यांदाच जन्म घेणा-या या पेंग्विनबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता होती.

26 जुलै 2016 रोजी राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन्स आणण्यात आले होते. त्यापैकीही एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. सात पैकी सहा पेंग्विनच्या जोडय़ा जुळल्या. त्यापैकी मिस्टर मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने 5 जुलैला अंडे दिले होते. या अंड्याची विशेष देखभाल केली जात होती. जन्माला आलेल्या पेंग्विनच्या पिल्लावर राणीच्या बागेतील डॉक्टर लक्ष ठेवून होते. या पिल्लाचा सुखरूप जन्म झाला, पण अवघ्या आठवड्याभरातच दुर्दैवी अंत झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number