Sunetra Pawar Meet Praful Patel-Sunil Tatkare: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांनी घेतली पटेल-तटकरेंची नवी दिल्लीत भेट

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु आहे. असं असताना सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची भेट घेतली.

Sunetra Pawar Meet Praful Patel-Sunil Tatkare: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांनी घेतली पटेल-तटकरेंची नवी दिल्लीत भेट

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सुनेत्रा पवारांनी मोठी भूमिका बजावली आहे. अशातच सुनेत्रा पवार यांची वेगळीच राजकीय रणनिती पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काल दिल्ली दौऱ्यावर होत्या जिथे त्यांनी आणि पार्थ पवारांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यावांसोबत बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवनाच्या परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे माजी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय इतर भाजप पक्षश्रेष्ठ्यांची उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी भेट घेतली.

यावेळी पक्षाचे कारभारी समजले जाणारे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुनेत्रा पवार यांच्यासोबत कुठे दिसले नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काल रात्रीच राजधानी दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाल्या होत्या. यानिमित्ताने भाजप पक्षश्रेष्ठीसोबत सुनेत्रा पवार राजकीय खलबतं करण्याची शक्यता वर्तावली जात होती. 

हेही वाचा- Sunetra Ajit Pawar : आताची मोठी राजकीय बातमी! सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यात?

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु आहे. असं असताना दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासाची बैठक झाली. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून दिल्लीमध्ये राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला.
कालच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या संसद भवनात दाखल झाल्या होत्या.

हेही वाचा- Jay Pawar: सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पार्थनंतर जयच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या पदावरील तटकरे आणि पटेल यांचा पत्रात उल्लेखच नाही

मात्र यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची उपस्थिती नव्हती. सुनेत्रा पवार तटकरे आणि पटेलांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 26 फेब्रुवारीला पाठवलेलं पत्र समोर आलं आहे. यात सुनेत्रा पवार यांच्याशिवाय फक्त शिवाजीराव गरजे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांचा उल्लेख यात करण्यात आला नाही तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number