MSRTC NCMC Card : ST च्या NCMC कार्ड सक्तीला मुदतवाढ; प्रवाशांच्या तक्रारींमुळे अखेर महामंडळाचा निर्णय

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) 1 सप्टेंबर 2026 पासून लागू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सक्तीच्या निर्णयाला अखेर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत स्थगिती दिली आहे.

MSRTC NCMC Card : ST च्या NCMC कार्ड सक्तीला मुदतवाढ; प्रवाशांच्या तक्रारींमुळे अखेर महामंडळाचा निर्णय

NCMC Card Deadline Extended till September 30: एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मार्ग परिवहन (MSRTC) महामंडळाने 1 सप्टेंबर 2026 पासून लागू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सक्तीच्या निर्णयाला अखेर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत स्थगिती दिली आहे. सर्व्हरवरील प्रचंड ताण आणि तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांना होणारा नाहक त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने हा मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला आहे.

सर्व्हर डाऊन आणि प्रवाशांच्या तक्रारींमुळे महामंडळाची माघार
1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्यानंतर अचानक कोट्यवधी प्रवाशांनी या प्रणालीचा वापर सुरू केला. त्यामुळे महामंडळाच्या सर्व्हरवर प्रचंड ताण येऊन सेवा अत्यंत संथ झाली. या तांत्रिक अडचणींमुळे तिकीट देताना वाहक व प्रवाशांमध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. सवलतीचे तिकीट मिळण्यात येणारे अडथळे लक्षात घेऊन सक्षम प्राधिकरणाने प्रचलित पद्धतीनुसार तिकिटे देण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

MSRTC च्या परिपत्रकातील मुख्य मार्गदर्शक तत्त्वे
एसटी महामंडळाने सर्व प्रादेशिक आणि आगार व्यवस्थापकांना दिलेल्या सुधारित सूचना अशा आहेत –

– ज्या प्रवाशांकडे अद्याप NCMC कार्ड नाही, त्यांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्वीच्याच प्रचलित पद्धतीने सवलतीचे तिकीट दिले जाईल.
– ज्या प्रवाशांचे एनसीएमसी कार्ड आधीच सक्रिय (Active) झाले आहे, त्यांनी मात्र कार्डद्वारेच सवलतीचा लाभ घेणे बंधनकारक असेल.
– तांत्रिक कारणास्तव कार्ड रीड न झाल्यास कोणत्याही पात्र प्रवाशाला सवलतीच्या तिकिटापासून वंचित ठेवले जाणार नाही.
– आगार स्तरावर चालक व वाहकांना या नियमांची तात्काळ माहिती देऊन प्रवाशांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – Wardha Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यावर अखेर 7 दिवसांनंतर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांची प्रशासनाच्या विनंतीला सहमती

प्रवाशांच्या मदतीसाठी NSDL पेमेंट्स बँकेची विशेष हेल्पलाइन
एनसीएमसी कार्ड रिचार्ज करणे, कार्ड ॲक्टिव्हेशन, टॉपअप करणे आणि उपलब्ध शिल्लक तपासणे यांसारख्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी महामंडळाने स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे. एनएसडीएल (NSDL) पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून प्रवाशांसाठी 022 42022190 आणि 022 69787303 हे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत तब्बल 1.11 कोटीहून अधिक प्रवाशांनी या योजनेत आपली नोंदणी केली आहे.

पात्र प्रवाशांची सोय आणि भविष्यातील नियोजन
तांत्रिक त्रुटी लवकरात लवकर दूर करून ही डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करण्याचे काम सध्या सुरू आहे. या मुदतवाढीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, 30 सप्टेंबरपर्यंत सर्वांना आपले कार्ड सहजपणे सक्रिय करून घेता येणार आहे.

हेही वाचा – Kokan Ganeshotsav: कोकणात मध्यरात्री गणपतीची ‘चोरी’! नवीन घराच्या दारात गुपचूप बाप्पा ठेवण्याची भन्नाट परंपरा, कारण ऐकून व्हाल थक्क

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number