Nashik Accident News : पाइपला धडकून तरुणाच्या मृत्यूला नवं वळण; CCTV फुटेज समोर, अपघाताआधी नेमकं काय घडलं?

नाशिक शहरातील कृषी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विचित्र अपघातात सिद्धार्थ गोरे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघाताच्या काही दिवसानंतर एक व्हिडिओ समोर आला.

Nashik Accident News : पाइपला धडकून तरुणाच्या मृत्यूला नवं वळण; CCTV फुटेज समोर, अपघाताआधी नेमकं काय घडलं?

नाशिक : नाशिक शहरातील कृषी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विचित्र अपघातात सिद्धार्थ गोरे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कृषी नगरमधील जॉगिंग ट्रॅकजवळ ही सर्व घटना घडली होती. परिसरात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु होते. याच कामासाठी रस्त्यावर आडव्या पद्धतीने पाइप ठेवण्यात आली होती. याच पाइपवर रात्रीच्या वेळी दुचाकी आदळल्याने सिद्धार्थचा अपघात झाला होता.

अपघात कसा घडला?
अपघातानंतर सिद्धार्थ गोरेचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संबंधित असलेल्या ठेकेदारावर गंभीर आरोप केले होते. पाइपलाइनचे काम सुरु असलेल्या ठिकाणी म्हणजे अपघातास्थळी वाहनचालकांना सावध करण्यासाठी आवश्यक सुरक्षा फलक हे लावले नव्हते, असा आरोप सिद्धार्थ गोरेच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा-Jalgaon: जळगावात खळबळजनक घटना! गिरणा नदीत महिलेची उडी, शोध सुरू

या अपघाताला ठेकेदाराचाच निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी आंदोलन केले होते. सिद्धार्थचा मृतदेह नाशिक महापालिका मुख्यालयाबाहेर नेत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली होती.

महापालिका प्रशासनाचा खुलासा
दरम्यान, मृत सिद्धार्थ गोरेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. रस्त्याचे काम सुरु असताना रस्त्यावर आडव्या ठेवलेल्या पाइपवर रेडियम लावण्यात आलेले होते, असा थेट दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यानंतर अपघातस्थळी सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का तसेच या घटनेसाठी नेमकी कोणाची जबाबदारी आहे, यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

‘तो’ व्हिडिओ समोर येताच नव वळण
अपघाताच्या काही दिवसानंतर याच मृत पावलेल्या सिद्धार्थ गोरे संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ हा एका बिअर बारमध्ये मद्यप्राशन करताना दिसत आहे, असा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आणि त्याचा वारंवार तोल जात असल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा-CRIME : भाजीवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला; मुलांसमोर पत्नीची गोळी झाडून हत्या; शेजारच्यांना आवाज जाताच पतीने केली हद्दच पार

त्यानंतर सिद्धार्थला दुचाकीवर बसतानाही काही तरुणांची मदत घ्यावी लागत असल्याचे, या व्हिडिओत स्पष्ट दिसून येत आहे. यानंतर त्याने दुचाकी चालवली आणि पुढे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर रस्त्याच्या कामामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या नव्या व्हायरल व्हिडिओमुळे या सर्व अपघाताला नवा संदर्भ मिळाला आहे. पण आता मद्यप्राशन करुन वाहन चालवले होते का, याचाही  तपास होणे गरजेचे आहे,त्यामउळे रस्त्यावीरल पाइप आणि सुरक्षेता अभाव हा मुद्दा कारणीभुत होता की वाहनचालकाचीच चूक झाली, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number