Nanded-Mumbai Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला 40 मिनिटे ब्रेक; कारण समजून बसेल धक्का

आपात्कालीन ब्रेक लावत गाडी थांबवण्यात आली आणि दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ती जवळपास 40 मिनिटे ती ट्रॅकवरच उभी राहिली.

Nanded-Mumbai Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला 40 मिनिटे ब्रेक; कारण समजून बसेल धक्का

Nanded-Mumbai Vande Bharat Express : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला जालना येथे एका म्हशीची धडक (Train Buffalo Collision Jalna) बसल्याने प्रवाशांत प्रचंड संताप उसळला. देशातील वेगवान गाड्यांपैकी एक असलेली ही एक्स्प्रेस या धडकेमुळे तब्बल 40 मिनिटे एकाच जागी थांबून राहिली. या अपघातात रेल्वेच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेमुळे, या मार्गावरील ट्रॅकच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जालना स्टेशनजवळ अपघात, गोंधळाचे वातावरण
मंगळवार, 9 डिसेंबरला सायंकाळी अंदाजे 6 वाजून 30 मिनिटांनी ही दुर्घटना जालना स्टेशनजवळ घडली. मुंबईहून नांदेडकडे निघालेल्या या एक्स्प्रेस मुक्तेश्वर तलावाजवळील गेटपर्यंत पोहोचताच अचानक एक म्हैस रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) आली आणि गाडीचा समोरचा भाग थेट तिच्यावर आदळला. धडकेचा जोर इतका होता की, वंदे भारतच्या 'नोज हेड'ला (Nose Head) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक गाडी थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये मनस्ताप, गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा – Ambadas Danve On Relief Fund: अतिवृष्टी मदत निधीवरून वाद वाढला; दानवे यांच्या आरोपांचे CMO कार्यालयाकडून उत्तर

वारंवार होणाऱ्या घटनांनी वाढवली चिंता
आपात्कालीन ब्रेक लावत गाडी थांबवण्यात आली आणि दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ती जवळपास 40 मिनिटे ती ट्रॅकवरच उभी राहिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी (Railway Officials) तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू केली. विशेष म्हणजे, हाच मार्ग पूर्वीही प्राण्यांच्या धडकेमुळे हादरला आहे. 2024 मध्ये लासूर स्थानकाजवळ वंदे भारतने एका बैलाला धडक दिली होती. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे प्राणी सुरक्षेबद्दल आणि ट्रॅकवरील नियंत्रणव्यवस्थेबद्दल (Animal Safety and Railway Track Control System) गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ट्रॅक सुरक्षेच्या उपाययोजना कधी?
स्थानिक नागरिकांनीही या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. प्राणी ट्रॅकवर कसे येतात? सुरक्षा कुंपण पुरेसे आहे का? जीआरपी–आरपीएफची गस्त (GRP-RPF Patrolling) प्रभावी आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राण्यांच्या जीविताला धोका, रेल्वेचे नुकसान (Railway Damage) आणि प्रवाशांचा वेळ व सुरक्षितता (Time and Safety), या तिहेरी आव्हानांमुळे वंदे भारतच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रेल्वे प्रशासनाची निष्काळजीपणा, तुटकी कुंपणं आणि अपुरी सुरक्षा याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. अधिकारी ट्रॅकजवळील सुरक्षा व्यवस्थेबद्दल कधी ठोस पावलं उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – Maharashtra Farmers Loan Scheme: न्यायालयाच्या आदेशानंतरही सहा लाखांपेक्षा शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित; सरकारची धक्कादायक कबुली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number