नालासोपाराच्या संतोष भवन परिसरात सकाळी साडेदहाच्या सुमारास पिसाटलेल्या रेड्याने चक्क दुचाकीला दिली आणि धडक देत सामानाच्या दुकानात घुसला. सुदैवाने यात कोणतीही जीवदानी झाली नसली तरी, दुकानाचे सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेड्याच्या धडकेमध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी सुरक्षिततेसाठी पळापळ केली झाली होती. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यामध्ये रेडा बाजारात धावताना आणि दुकानात घुसतानाचे दृश्य स्पष्ट दिसत आहे.