Heavy Gym Workout Side-effect : जिममध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणं बेतलं जिवावर; 23 वर्षाच्या तरुणाची मेंदूतली रक्तवाहिनी फाटली अन्…

सुरुवातीला डोकेदुखीकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केल्याने थेट मेंदूतील रक्तवाहिनी फुटली आणि 23 वर्षीय तरुण थेट कोमात गेला.

Heavy Gym Workout Side-effect : जिममध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणं बेतलं जिवावर; 23 वर्षाच्या तरुणाची मेंदूतली रक्तवाहिनी फाटली अन्…

Heavy Gym Workout Side-effect : नागपूरात जिममधील अतिव्यायाम आणि परीक्षेचा ताण एका तरुणाच्या जीवावर बेतला. सुरुवातीला डोकेदुखीकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केल्याने थेट मेंदूतील रक्तवाहिनी फुटली आणि 23 वर्षीय तरुण थेट कोमात गेला. मात्र, त्याची आई स्वतः नर्स असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिने तातडीने निर्णय घेत डॉक्टरांकडे धाव घेतली. यामुळे अगदी ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्याने ओमचे प्राण वाचले. डॉक्टरांनी त्याला अक्षरशः नवजीवन दिलं असंच म्हणणं योग्य ठरेल.

तीव्र डोकेदुखी.. अन् क्षणांतच शुद्ध हरपली
23 वर्षीय ओम भोयर… ह्याला जिमची फार आवड… तो बायोफार्मचा विद्यार्थी आहे. अगदी परीक्षेचा काळ असतानाही त्यानं जिमला जायला सोडलं नाही. यादरम्यानच त्याला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. मात्र, ही साधी तक्रार आहे, असल्याचं समजत त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं.. हीच मोठी चूक झाली..  पण योग्य वेळी उपचारात मिळाल्यानं तो मृत्यूचा दारातून परत आला… आठ दिवसांपासून डोकेदुखीने त्रस्त, परीक्षेचा ताण, रात्रभर जागरण आणि त्यातच जिममधील अतिव्यायाम या सगळ्यामुळे त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. अचानक तीव्र डोकेदुखी सुरू झाली आणि काही क्षणांतच ओम कोमामध्ये गेला..

गंभीर स्थितीत मृत्यूशी झुंज
मात्र, आईने स्वतः नर्स असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर MRI मध्ये मेंदूत रक्तस्त्राव आणि गुठळी असल्याचं स्पष्ट झालं. तरुण अत्यंत गंभीर स्थितीत मृत्यूशी झुंज देत होता. यानंतर डॉक्टरांनी तातडीने ‘एंडोव्हॅस्क्युलर’ उपचाराचा निर्णय घेतला.‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ प्रक्रियेद्वारे पायाच्या शिरेतून मेंदूपर्यंत कॅथेटर नेऊन गुठळी काढण्यात आली आणि काही मिनिटांतच मेंदूतील रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत करण्यात यश आलं. सुदैवाने घरच्यांनी परिस्थिती ओळखणे आणि वेळेत योग्य उपचार मिळाल्यामुळे तरुणाचं दैव बलवत्तर होतं, असंच म्हणावं लागेल.

हेही वाचा – Fake Paneer : बनावट पनीर विक्रीस बंदी; महाराष्ट्राच्या आदेशाची केंद्राकडूनही होणार अंमलबजावणी

शारीरिक आणि मानसिक अतिताण घातकच
ओमच्या आईने दिलेल्या माहिती नुसार, त्याचं डोके दुखत होतं आणि अचानक तो बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले म्हणून आपला मुलगा वाचल्याचं त्या सांगतात. त्यामुळे अभ्यासाच्या काळात मुलांनी फक्त अभ्यासच करावा आणि त्यांनी इतर ताण घेऊ नये. खरं तर दैव बलवत्तर होतं म्हणून त्यांचा मुलगा मृत्यूच्या दरीतून परत आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ओमवरती उपचार करणारे डॉ. सचिन ढोमने यांनी सांगितले की, 'एंडोव्हॅस्क्युलर सर्जरीमुळे छोट्या छिद्रातून मेंदूपर्यंत पोहोचून ब्लॉकेज काढता येतं. गोल्डन अवरमध्ये उपचार केल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता खूप वाढते. तरुणांनी अति व्यायाम आणि स्टिरॉईड्सपासून दूर राहावं.'

फिटनेस आणि स्पर्धेच्या नादात शरीरावर अतिताण देणं जीवघेणं
व्हेंटिलेटरवर असलेला ओम अवघ्या 10 दिवसांत स्वतःच्या पायावर उभा राहिला. सध्या त्याच्यावर घरी उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, ही घटना सर्वांसाठीच एक इशारा आहे. फिटनेस आणि स्पर्धेच्या नादात शरीरावर अतिताण देणं जीवघेणं ठरू शकतं. वेळीच उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो. पण दुर्लक्ष केल्यास परिणाम गंभीर होऊ शकतात. फिटनेस महत्त्वाचा. पण अतिरेक टाळणं त्याहून महत्त्वाचं, ही बाब या निमित्ताने लक्षात येत आहे.

हेही वाचा – Nagpur Shocking News: धक्कादायक! 11 महिन्यांच्या चिमुकलीचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number